स्व. गणेश गौतम घावटे पा. युवा मंच व रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने नवदुर्गा पुरस्कार प्रदान

 विभागीय संपादक रवींद्र खुडे

स्व. गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच व रामलिंग महिला उन्नत्ती बहुउद्देशिय सामाजिक संस्था, रामलिंग (जुने शिरूर) यांच्या वतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला.
या नवरात्र उत्सवामध्ये विविध उपक्रम साजरे करण्यात आले. यामध्ये संगीत खुर्ची, उखाणेस्पर्धा, लिंबू चमचा, वेशभुषा स्पर्धा, डान्स स्पर्धा, आरोग्य तपासणी (BMI), कॅन्सर तपासणी, गौरव नारीशक्तीचा, होम मिनिस्टर, दांडिया असे विविध उपक्रम घेण्यात आले. त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले.
सोमवार दि. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी, मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना “नवदुर्गा पुरस्कार” वितरण करण्यात आले. यावेळी रामलिंग महिला उन्नत्ती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, स्व. गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच अध्यक्ष मंगेश घावटे, शिरूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ अलका सरोदे, शिवसेनेच्या उर्मिला फलके, महीला दक्षता समिती सदस्या श्रुतिका झांबरे, राणी शिंदे, ॲड सरिता खेडकर, ॲड अमृता खेडकर, मा. ग्रा. सदस्या सुनंदा घावटे, हिराबाई जामदार, प्रिया बिरादार, मीरा परदेशी, आधार छाया फाऊंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, डॉ. वैशाली साखरे, ममता गोसावी, रोहिणी जामदार, स्नेहा जामदार, गायत्री डोंगरे, दिपाली आंबरे, आशा पाचंगे, शिला पाचंगे, राजश्री ढमढेरे, शबाना शेख आदी महिला मान्यवर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
यात आदर्श गृहिणी भारती रवींद्र खुडे (चांदणे), आदर्श उद्योजिका वैशाली गायकवाड, आदर्श पत्रकार दिपाली काळे, आदर्श डॉक्टर स्मिता बोरा, आदर्श समाजसेविका शोभना पाचंगे, आदर्श शिक्षिका कुसुम लांघी, आदर्श नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे, आदर्श कलाक्षेत्र डॉ सुनीता पोटे, आदर्श वकील सुवर्णा वाघमारे, आदर्श पत्रकार दिपाली काळे यांना भव्य अशी आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
रामलिंग येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमावेळी, शिरूर रामलिंग व पंचक्रोशीतील अनेक महिला व पुरुष मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुत्रसंचालन राणी कर्डिले यांनी केले तर आभार मंगेश घावटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *