पिंपरी चिंचवड शहरातून भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ पवार यांनी आपल्या हाती शिवसेना ठाकरे गटाचा भगवा घेतला आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी तुम्ही आपला आवाजवर पाहत आहात. 500 हुन अधिक वाहनांच्या ताफ्या सह मुंबईत एकनाथ पवार हे मुंबईत दुपारीच दाखल झाले होते.
पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. आहेत. एकनाथ पवारांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपला पिंपरी चिंचवड शहरातून मोठी गळती लागली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्याचा पवार यांनी नुकताच राजीनामा दिला होता. तसेच, आपण दि. 27 ऑक्टोबर रोजी पुढील भूमिका जाहीर करू असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले हेते.
एकनाथ पवार हे पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाचे एक मोठे अनुभवी नेते म्हणून मानले जातात . त्यांनी 2014साली भाजपाच्या तिकिटावर भोसरी विधानसभेची निवडणुकही लढविली होती. त्याचबरोबर पक्षाचे सभागृह नेते म्हणुन त्यांनी पक्षासाठी चांगली जबाबदारी पार पाडली होती..
दरम्यान, एकनाथ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दिला आहे. तसेच, एकनाथ पवार हे लोहा कंधार विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणुक लढवू ईच्छीत आहेत. या या मतदार संघात शिवसेनेची चांगली ताकद असल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. ह्या पक्ष प्रवेश वेळी शहरातील स्थानिक शिवसैनिक देखील मोठ्या संख्यने उपस्तित होते
सबनीस विद्यामंदिराचे शासकीय क्रीडास्पर्धेत घवघवीत यश, नऊ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेसाठी निवड
नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक) क्रीडा व युवा सेवा संचलनालय,पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,पुणे आयोजित शालेय विभागस्तरीय…