अमित शहांच्या ताटाखालच्या मांजराचा हा दसरा मेळावा आहे; अंबादास दानवे यांची शिंदे गटावर टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ ऑक्टोबर २०२२


आजचा दिवस राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा पार पडणार आहे. शिंदेगटाच्या दसरा मेळाव्यावर पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

अमित शहांच्या ताटाखालच्या मांजराचा हा दसरा मेळावा आहे, अशा शब्दात दानवे यांनी एकनाथ शिंदेवर टीका केलीय. आमचा दसरा मेळावा हा या गद्दारांच्या पिकाचा नायनाट करण्यासाठी आहे. पुढच्या दसरा मेळाव्यापर्यंत या राक्षसांचा नायनाट झालेला असेल, असंही दानवे यांनी म्हंटलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *