शिरूर पोलिसांची डोकेदुखी ठरलेले विद्युतपंप चोर अखेर जेरबंद

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
१४ जुलै २०२२

शिरूर


शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील आमदाबाद, टाकळी हाजी व बेट भागातून, मे २०२२ मध्ये शेतीला पाणी पुरवठा करण्यात येणारे, सुमारे आठ विद्युत कृषी पंप चोरीला गेल्याने, शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झालेले होते. त्या नंतर लगोलग बेत भागात अनेक चोऱ्या होऊन, त्यातही अनेक कृषी पंप चोरी झलेले होते. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांनी व बेट भागातील शेतकऱ्यांनी, शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलेले होते. चोरीचे सत्र सतत चालूच असल्याने, पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी स्वतः यात लक्ष घालत, या चोरांना पकडण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शिरूर पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी वेगवेगळी पथके तयार करून, शोध चालू केला होता. त्यात शिरूर पोलिसांना यश आले असून, चार चोरांना ताब्यात घेण्यात आले असून, सतरा कृषी पंपही हस्तगत करण्यात आले आहेत.

या चोरांमध्ये
१) पांडुरंग शिवाजी बोडरे (वय वर्ष २०, रा. रावडेवाडी, ता. शिरूर, जी. पुणे)
२) कुलदीप उर्फ मोन्या बबन बोडरे (वय वर्ष २०, रा. सदर)
३) अझर हुसेन खान (वय वर्ष २२, रा. सिन्नर, जी. नाशिक)
४) अख्तर उर्फ कुलू हुसेन खान (भंगार व्यावसायिक, वय वर्ष २७, रा. आमदाबाद फाटा, ता. शिरूर, जी. पुणे)

यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १७ कृषी पंप, चोरी साठी वापरलेली १ मोटार सायकल व १ छोटा हत्ती हे चार चाकी वाहन हस्तगत केलेले आहे. या चोरांना पकडल्याने आता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळणार आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण चे पोलोस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मीतेश गट्टे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शिरूर, यशवंत गवारी यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उप निरीक्षक सुनील उगले, पोलीस नायक धनंजय थेऊरकर, सहाय्यक फौजदार नजीम पठाण, पोलीस काँ. सुरेश नागलोत, विशाल पालवे, दीपक पवार, राजेंद्र गोपाळे, विनोद काळे व होमगार्ड अक्षय येवले, बिपीन खामकर या टीमने केलेली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *