घोडेगाव – विवाहित महिलेवर अत्याचार करणाऱ्या फरार आरोपींना अटक

आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी


 

प्रियकराला भेटण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर चार जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली होती.याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून घोडेगाव पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला होता.यातील फरार आरोपींना दिनांक ७ रोजी भीमाशंकर परिसरातील जंगलातून अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्यातील एका गावातील विवाहित महिला शुक्रवारी २३ जून सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ती प्रियकराला भेटण्यासाठी जंगलात गेली असता तिच्या प्रियकराच्या चार मित्रांनी दोघांचाही पाठलाग करत जंगलात एकटं पाहून त्यांनी विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता. घडलेला प्रकार कुणालाही सांगितल्यास तुला जीवे मारू,अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला होता.या घटनेनंतर पीडिता प्रचंड घाबरली. तिने तातडीने घोडेगाव पोलिसांत धाव घेत घडलेली घटना सांगितली.पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार,पोलिसांनी संदेश अशोक जाधव, आदेश अशोक जाधव, आकाश चंद्रकांत भालेराव तिघे( रा. पिंपळगाव घोडे ता. आंबेगाव व संजय सुरेश शिंदे ( रा. जऊळके ता. खेड ) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.गुन्हा घडल्यानंतर आरोपी फरार झाले होते. त्यानंतर घोडेगाव पोलिसांनी गुप्त बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आदेश अशोक जाधव, संदेश अशोक जाधव ( रा.पिंपळगाव घोडे ता.आंबेगाव )संजय सुरेश शिंदे ( रा.जवळके ता.खेड ) यातिनही फरार आरोपीना शुक्रवार, दि.७ जुलै रोजी शिताफीने भीमाशंकर परिसरातील जंगलातून ताब्यात घेतले आहे.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी खेड सुदर्शन पाटील, घोडेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज पोलीस हवालदार वंजारी, तळपे, मनीषा तुरे यांनी पार पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *