राष्ट्रवादी ग्रंथालय सेल च्या माध्यमातून 22 वा वर्धापण दिन पुस्तक सप्ताह म्हणून नारायणगाव येथे साजरा…

ओझर प्रतिनिधी : मंगेश शेळके

दि.१० जून २०२१ (ओझर)

महाराष्ट्रराज्य राष्ट्रवादी ग्रंथालय सेल चे प्रदेश अध्यक्ष आ.उमेशदादा पाटील व ग्रंथालय सेल च्या महाराष्ट्रराज्य समन्वय समिती अध्यक्षा रिता ताई बाविस्कर यांचे मार्गदर्शना खाली


दिनांक 10/6/2021 रोजी ज्ञानदिप सार्वजनिक ग्रंथालय नारायणगाव यांचे संस्थापक अध्यक्ष संदीपशेठ नाईक,यांचे अध्यक्षते खाली साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी रविशेठ देवकर, रंगनाथशेठ नाईक,विजय नाईक, बाळासाहेब फुलवडे, पत्रकार नामदेव पवार , पत्रकार राहुल कडलक ,सचिन जाधव, किरण शेटे,शुभम नाईक, विक्रम नाईक, रामदास नाईक ,जालींदर नाईक, अतूल भास्कर , गौरव तिवारी ,सीमा नाईक, शुभांगी देवकर ,सारीका औटी , शालवी नाईक,व इतर मान्यवर उपस्थित होते .

या निमित्ताने परिसरातील इयत्ता १ ली ते १० पर्यंत च्या विद्यार्थ्यांना १०० पुस्तकांचे वाटप केले , आलेल्या सर्व मुलांना खाऊ वाटप केला , व पर्यावरणाचे रक्षण व्हावे म्हणून वृक्षारोपण करुन हा पुस्तक सप्ताह उत्साहात साजरा केला.

Advertise

या वेळी मुलांनमध्ये वाचन संस्कृती वाढावी, मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून संदीपशेठ नाईक यांनी मार्गदर्शन केले व जी मुले ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करतील त्यांचे दर महीन्याला मुल्यमापन करुन त्यांना बक्षिसांचे वाटप करायचे असे त्यांनी या वेळी जाहीर केले.