२०१८-१९ पासुन विविध कारणांमुळे रखडलेल्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणार

सन २०१८-१९ पासून महाडीबीटी प्रणालीमार्फत मैट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असली, तरी पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत अर्ज भरता न येणे, अर्ज Auto Reject होणे, एखाद्या वर्षी अर्ज भरता न आल्यास त्या वर्षी Gap Year असे पोर्टलवर नमूद होऊन पुढच्या वर्षीचा अर्ज भरण्यास अडचण येणे अशा बऱ्याच अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत होता. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देता येत नव्हता.

या सर्व अडचणींचा विचार करून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कडून या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती करता वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. या पाठपुराव्याला यश आले असून काल २४ मे रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागाने या संदर्भात परिपत्रक काढले. करता, सन २०१८-१९ पासून सन २०२१-२२ पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना अशा आल्या आहेत, अशा प्रकरणी निर्णय घेण्यास हा विभाग सक्षम असल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागाने अभिप्राय दिले आहेत.

आता विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे सन २०१८-१९ ते २०२१-२२ या कालावधीतील शिष्यवृत्ती / फेलोशीप योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *