परिवर्तन घडवून आणण्यासाठी नाना काटे यांना तब्बल 40 संघटनांचा पाठिंबा !

भाजपच्या धोरणामुळे देशासमोर भीषण प्रश्न – मानव कांबळे

 

 

भारतीय जनता पक्ष देशात धार्मिक आणि जातीय राजकारण करत आहेत. देशात आर्थिक विषमता वाढत आहेत असून त्यामुळे धार्मिक आणि आर्थिक तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंची महागाई, स्वातंत्र्यानंतर उच्चांकी पहिल्यांदाच वाढलेली बेरोजगारी हे देशासमोर भीषण प्रश्न असताना भाजप मात्र धर्माच्या आणि मंदिराच्या नावाने राजकारण करत आहे, त्यामुळे परिवर्तन घडणे ही काळाची गरज बनली आहे. परिवर्तनाची सुरुवात चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीपासून सुरू करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक व पुरोगामी चळवळीतील तब्बल 40 संघटनांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना आपला पाठिंबा जाहीर केला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पुरोगामी पक्ष, संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाना काटे यांना पाठींबा जाहीर केला. त्याप्रसंगी रहाटणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मानव कांबळे बोलत होते.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेस महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, प्रचारप्रमुख भाऊसाहेब भोईर, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुंभे यांच्यासह नागरी हक्क सुरक्षा समितीचे मानव कांबळे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे काशिनाथ नखाते, कामगार संघटनेचे डॉ. सुरेश बेरी यांच्यासह धनाजी येळकर पाटील, सचिन आल्हाट, सतीश काळे, गणेश दराडे, प्रकाश जाधव, अमीन शेख, अपर्णा दराडे, युवराज बाळासाहेब पवार, अशोक मिरगे, कॉ माधव रोहम, प्रल्हाद कांबळे, अरविंद जक्का, शैलेश गाडे, लता भिसे, शिवशंकर उबाळे, विशाल कसबे, सचिन भाऊ सकाटे, हरिभाऊ वाघमारे, अभिजीत भालेराव, चेतन वाघमारे, शांताराम खुडे, सचिन बगाडे, गिरीश साबळे, बाबासाहेब चव्हाण, प्रदिप पवार, राजेश माने, आशिष शिंदे, लालासाहेब गायकवाड, दिलीप काकडे, डॉ, कॉ . बी.टी . देशमुख, सिद्धेश्वर, तानाजी हराळे, चंद्रकांत क्षीरसागर, अनंत व्हंडरने, नकुल भोईर, संतोष वाघे व इतर मान्यवर या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

पुढे बोलताना मानव कांबळे म्हणाले, न्यायव्यवस्था, रिझर्व्ह बॅंक, निवडणूक आयोग, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा उपयोग विरोधी सरकार पाडण्यासाठी केला जात आहे. सर्व प्रकारचे दबाव तंत्र वापरून जर सरकारच्या विरोधात बोलणारे गप्पा बसत नसतील तर कायद्याचा वापर करून पत्रकारांना जेलमध्ये टाकले जात आहे. एकूणच या केंद्र सरकारकडून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शेतकऱ्यांना कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असंविधानिक मार्गाने व अनैतिक पद्धतीने आठ महिन्यापूर्वी शिंदे सरकार स्थापन केले. भारतीय जनता पक्षाचे व शिंदे गटाचे नेते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील अशा महापुरुषांचा अवमान वक्तव्य करतात. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी वारंवार महापुरुषांचा अवमान केला त्यांना पाठीशी घालण्याचे काम शिंदे आणि फडणवीस सरकार करत आहे.
यावेळी बोलताना धनाजी येळेकर म्हणाले, पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर आहे. मागील पाच वर्षांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मात्र या काळात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुराव्यानिशी समोर आले. 24 तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देऊनही गेल्या तीन-चार वर्षांपासून शहरांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था, पूर्वीपेक्षा अधिक वाहतूक कोंडी, कचऱ्याचे ढीग, अशा वेगवेगळ्या प्रश्नांवरून लोकांची फसवणूक होत आहे.
सत्ताधारी पक्षातील आमदार सध्याच्या आणि मंत्री पदाच्या शहरातील नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडण्याचे धाडस करत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षांची ताकद वाढवणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्षाला लोकोपयोगी निर्णय घेता येत नाहीत. विधिमंडळातील विरोधी पक्षाची ताकद वाढली पाहिजे यासाठी शहरी पुरोगामी पक्ष संघटना व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील तब्बल 40 संघटना नाना काटे यांच्या पाठीशी उभारल्याने महाविकास आघाडी या मतदारसंघात अधिक भक्कम झाली असून नाना काटे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

पाठिंब्याबद्दल आभार – नाना काटे
सध्या सुरू असलेल्या पोटनिवडणुकीमध्ये परिवर्तन अटळ आहे. मतदारसंघातील मतदार यावेळी विकासकामांच्या मुद्द्यावर मतदान करतील याचा मला विश्वास आहे. भाजपच्या भ्रष्ट कारभाराविरोधात सुरू असलेल्या आमच्या लढ्याला एकाचवेळी चाळीस संघटनांनी पाठिंबा देणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपण दिलेल्या पाठिंबाद्याबद्दल मी आपला आभारी आहे.

पाठिंबा दिलेल्या संघटना
बाबा आढाव- हमाल पंचायत, मानव कांबळे- नागरी हक्क सुरक्षा समिती, काशिनाथ नखाते- कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, डॉ सुरेश बेरी- कामगार संघटना, धनाजी येळकर पाटील – छावा संघटना, सतीश काळे – संभाजी ब्रिगेड, सचिन आल्हाट- छावा संघटना, गणेश दराडे- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अमीन शेख – DYFI पिं.चिं. सचिव, अपर्णा दराडे- जनवादी संघटना, प्रकाश जाधव – मराठा सेवासंघ उद्योग आघाडी, युवराज बाळासाहेब पवार- पिंपरी चिंचवड कामगार संघटना, अशोक मिरगे, आत्माराम नाणेकर – रिक्षा पंचायत पुणे पिंपरी चिंचवड, माधव रोहम- ग्रीव्हज कॉटन युनियन, प्रल्हाद कांबळे- हॉकर्स महासंघ, अरविंद जक्का- आयटक संघटना, शैलेश गोडे – पथारी व्यवसाय पंचायत-, लता भिसे- महिला संघटना आयटक, शिवशंकर उबाळे- भीमशाही युवा संघटना, निवृत्ती आरु – संस्थापक सदस्य, कार्याध्यक्ष महारष्ट्र प्रदेश, पँथर्स रिपब्लिकन पार्टी, विशाल कसबे- मातंग एकता आंदोलन संघटना, सचिन भाऊ सकाटे- दलित महासंघ, हरिभाऊ वाघमारे- झोपडपट्टी सुरक्षा दल, अभिजीत भालेराव- स्वाभिमानी विकास मंच संघटना, चेतन वाघमारे- सावता परिषद संघटना, शांताराम खुडे- भ्रष्टाचार निर्मूलन समिती, सचिन बगाडे- सत्यशोधक बहुजन आघाडी, गिरीश साबळे- महामानव एक्सप्रेस रिक्षा संघटना,बाबासाहेब चव्हाण- एकता रिक्षा महासंघ, प्रदिप पवार- स्वराज अभियान महाराष्ट्र, राजेश माने- बांधकाम कामगार संघ, आशिष शिंदे-कामगार नेते, लालावसाहेब गायकवाड- अखिल भारतीय निर्मुलन समिती, दिलीप काकड- नागरी हक्क सुरक्षा समिती, डॉ. कॉ. बी. टी. देशमुख- CPIM, सिद्धेश्वर कोटुळे, तानाजी हराळे- बाबा आढाव संघटना, चंद्रकांत खंडू क्षीरसागर – बाबा आढाव संघटना, नकुल आनंदा भोईर- वीरभागात सिंग विध्यार्थी परिषद, संतोष वाघे – छावा मराठा संघटना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *