आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे दुर्गा रत्न पुरस्काराने सन्मानित…

आपला आवाज न्युज नेटवर्क च्या शिरपेचात मानाचा तुरा

 

महासंसदरत्न खासदार मा.श्रीरंग आप्पा बारणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने लोकाभिमुख कर्तव्य संपन्न,आदर्श व्यक्तिमत्वांचा गौरव सोहळ्यात सौ.संगिता प्रशांत तरडे,विभागीय संपादिका आपला आवाज न्युज नेटवर्क, संचालिका आपला आवाज आपली सखी,ब्रँड अँम्बेसिडर पीसीएमसी महामेट्रो पिंपरी स्टेशन यांना दुर्गा रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महासंसदरत्न खासदार माननीय श्रीरंग आप्पा बारणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न आदर्श व्यक्तिमत्वांचा गौरव सोहळा दिनांक 16 फेब्रुवारी प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,माजी मंत्री विजय शिवतारे
माजी खासदार अमर साबळे, बाळासाहेबांची शिवसेना उपनेते इरफान सय्यद, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर,महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विश्वजीत बारणे फाऊंडेशन चे अध्यक्ष धनाजी बारणे सचिव बशीर सुतार उपाध्यक्ष रवी नामदे
उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील २० जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या पुरस्कार्थी मध्ये अमित गोरखे ( शिक्षण ) , मुकुंद कुचेकर ( समाज ) , डॉ . पं . नंदकिशोर कपोते ( कला गौरव ) , सूर्यकांत मूथियान ( पर्यावरण ) , वसंत काटे ( उद्योग ) , माया रणवरे ( दुर्गा ) , डॉ . नारायण सुरवसे ( सेवा ) , प्रा . सुनीता नवले ( दुर्गा ) , विजयन ( शिक्षण ) , शेखर कुटे ( वारकरी ) , संगीता तरडे ( दुर्गा ) , अमरसिंह निकम ( आरोग्य ) , वृषाली मरळ ( आधार ) , संतोष कणसे ( श्रमिक ) , आलम शेख , भगवान मुळे ( समाज ) , जयदेव म्हमाणे ( क्रीडा ) , प्रमोद शिवतरे ( समाज ) , अनिल साळुंखे ( समाज ) आणि शुभंकर को हौसिंग सोसायटी ( आदर्श ) यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *