सेवानिवृत्त पोलिसांच्या न्याय्य प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच राज्यभरातील सेवानिवृत पोलीस संघटना एकत्र येऊन नूतन शिखर संस्थेची स्थापना : संपत जाधव, अध्यक्ष

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. १६/०२/२०२३

 

महाराष्ट्र राज्यातील सेवानिवृत्त पोलीस बांधवांच्या सर्व विखुरलेल्या संस्थांचे एकत्रिकरण करून, पोलिसांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य पातळीवर मध्यवर्ती शिखर संस्थेची स्थापना करण्याचे नियोजन अनेक दिवसापासून चालू होते. त्यासाठी पुणे येथील सेवानिवृत्त पोलीस बांधव संस्थेचे अध्यक्ष संपतराव जाधव, कार्याध्यक्ष महादेव पवार, मुंबईचे मोहनराव तोडकर, रायगडचे राजेंद्र कासार हे प्रयत्नशील होते.
याच पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी पुणे (चंदननगर) येथे राज्यभरातील निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील अनेक संघटनांचे पदाधिकारी आलेले होते. त्यामुळे या बैठकीत एकमताने “सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्था, महाराष्ट्र राज्य” या संस्थेची स्थापना करण्यात आली. तसेच सर्वानुमते या शिखर संस्थेचे अध्यक्ष म्हणून, पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील रामलिंग गावचे सुपुत्र तथा राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी संपत जाधव यांची एकमताने निवड करण्यात आलीय.
या बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. त्यात, पोलिसांना सेवानिवृत्तिनंतर मोफत वैद्यकीय सुविधा, टोलमाफी, जुलै महिन्याची वेतनवाढ, निवृत्तीनंतरचे देय लाभ वेळेवर मिळणे, तिन आश्वासित योजनेअंतर्गत ३० वर्षानंतर पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नति, पदोन्नतीचे प्रलंबित प्रश्न, पोलिस मतदार संघ, पोलिस भरतीत पोलिसांच्या मुलांना 25 टक्के आरक्षण, राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित व्यक्तींच्या सवलतित वाढ करणे, उत्कृष्ट कामासाठी मिळालेली वेतन वाढ जी बंद केलेली आहे ती परत चालू करणे. यांसह अनेक प्रश्नांसाठी, वेळोवेळि विविध संघटनांनी शासनास पत्रव्यवहार करून, भेटीची वेळ मागितली होती. परंतु शासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. परंतु या मागण्यांचा विचार शासनाने मान्य केलाच पाहिजे व आपल्याला भेटीसाठी बोलावलेच पाहिजे, यासाठी सर्व संघटनानी एकत्र येऊन शिखर संस्था स्थापनेवर घेतलेला निर्णय अमलात येऊन, राज्य पातळीवर सेवानिवृत्त पोलिसांचे एक भव्य संघटन, शिखर संस्थेच्या रूपाने उभे करण्यात आलेले असल्याचे तसेच, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पोलिसांच्या अशा विविध प्रश्नांवर अनेकदा निवेदने देऊनही शासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. यासाठी आंदोलनात्मक कार्यक्रमाचे नियोजन करण्याबाबत मनोदय व्यक्त करण्यात आल्याचे जाधव यांनी आपला आवाज न्युज नेटवर्कशी बोलताना सांगितले.
संस्थेचे नूतन कार्यकारीणी मंडळ –
संपतराव जाधव, (अध्यक्ष), महादेव पवार (महासचिव), मोहन तोडकर (कार्याध्यक्ष), पंढरीनाथ मांढरे (उपाध्यक्ष), मच्छिंद्र कांगणे (उपाध्यक्ष), मोतीलाल ठाकूर (उपाध्यक्ष), शरद बोंगाळे (खजिनदार), नंदकुमार शेलार (सहसचिव), राजेंद्र सरवदे (सह खजिनदार), मीनाक्षी पेठे (सल्लागार), राजेंद्र कासार (सह सल्लागार), सुभाष तोडकर (प्रसिद्ध प्रमुख), भैयालाल ठाकरे (सह प्रसिद्धीप्रमुख), विष्णू पवार (उपाध्यक्ष), खंडेराव गांधले (उपाध्यक्ष), ओंकार प्रसाद श्रीवास (उपाध्यक्ष), सुर्यकांत चव्हाण कार्यकारीणी सदस्य, जगन्नाथ जगदाळे कार्यकारीणी सदस्य, सखाहरि शेळके (सल्लागार सदस्य), विजय जाधव (सह संपर्कप्रमुख), संतोष गजभिव कार्यकारीणी सदस्य.
महाराष्ट्रातील सर्व सेवानिवृत्त सदस्यांना शिखर संस्थेच्या स्थापनेची, योजनांची व पुढील नियोजनात्मक कार्यक्रमांची माहिती मिळावी आणि महाराष्ट्रातील सर्व सेवानिवृत्त पोलीस बांधव या शिखर संस्थेशी जोडले जावेत हाच या मागचा उद्देश असुन, येत्या काही दिवसांत राज्यातील सर्व निवृत्त पोलीस बांधवांची एक भव्य सभा घेण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी यावेळी सांगितले.
मिटींग यशस्वीतेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबतच, पुणे संघटनेचे उपाध्यक्ष श्रीरंग लंघे, सचिव सुरेश शेळके, खजिनदार मच्छिंद्र कुंभार, फत्तेसिंग गायकवाड, नाशिक अध्यक्ष निकम, कारागृह अध्यक्ष गुंजाळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद पवार यांनी केले, तर आभार सदाशिव भगत यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *