नवरात्री उत्सव शासनाने दिलेल्या नियमांनुसार शांततेत पार पाडावा -परशुराम कांबळे

कैलास बोडके
प्रतिनिधी
६ ऑक्टोबर २०२१

जुन्नर

जुन्नर तालुक्यातील ओतूर गावाच्या पोलीस स्टेशनं हद्दीत असणाऱ्या सर्व नवरात्र उत्सवाच्या मंडळाचे अध्यक्ष यांना ओतूर पोलीस स्टेशनं मध्ये बोलावून सवांद साधत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत हा नवरात्री उत्सव साजरा करावा त्याच बरोबर कुठल्याही प्रकारे डॉल्बी किव्हा बेंजो लावून देवींची मिरवणूक  कुणीही न काढता शासनाने दिलेल्या आदेशानुसार उत्सव पार पाडावा असे आवाहन ओतूर पोलीस स्टेशनंचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी केले आहे. जे कुणी नियमांचे पालन करनार नाही त्यांच्या वर कायदेशीर कारवाई देखील केली जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

पोलीस स्टेशनं च्या हद्दीत वाढत्या चोऱ्यांकडे पाहता चोरी होऊ नये या साठी प्रत्येक उद्योजक यांनी आप आपल्या व्यवसायाची काळजी स्वतः घेऊन त्याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावा जेणे करून चोऱ्यांचे प्रमाण थांबेल असे देखील आवाहन कांबळे यांनी केले आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल केरुरकर, भाऊसाहेब कर्डीले पोलीस हवालदार बाळासाहेब तळपे,ताऊजी दाते, मनोज राठोड,रोहित बोंबले, जोतिराम पवार,शिंदे मॅडम, गजनान डाके, खंडेराव राहणे,पोलीस स्टेशनंचे कर्मचारी व हद्दीत असणारे सर्व गावाचे पोलीस पाटील तसेच नवरात्री उत्सवाचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *