ज्ञानगंगा स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनात अभिनेते भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे यांची उपस्थिती : पत्रकार, निवेदक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा केला सन्मान

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. ०८/०२/२०२३
शिरूर येथील गंगा एज्यूकेशन सोसायटीमध्ये नुकताच वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने, संस्थेने यंदा अभिनेत्यांना कार्यक्रमासाठी पाचारण केलेले होते. त्यास “चला हवा येऊ द्या” फेम व अभिनेते भारत गणेशपुरे व अभिनेत्री श्रेया बुगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारत गणेशपुरे यांनी मनोगतात स्पष्ट केले की, “कोणतीही गोष्ट शिकताना प्रचंड मेहनत, जिद्द व कष्ट घ्यावे लागतात. इच्छाशक्ती व योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर माणूस यशाच्या उंच शिखरावर पोचू शकतो.”
अभिनेत्री श्रेया बुगडे यांनीही उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, स्वतःच्या जीवनपटावर प्रकाश टाकत, लहानपण ते आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास मनमोकळेपणे सांगत सर्वांची मने जिंकली. तसेच त्यांचे अनेक प्रसिद्ध डायलॉग ही प्रत्यक्ष ऐकण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली.
तसेच कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे, जनता दल सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, पारनेरचे आमदार निलेश लंके, दौंडचे आमदार राहुल कुल, जी प चे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी जी प सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे, श्रीमती मालतीताई बाबुराव पाचर्णे, शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, संपदा नागरी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकरमामा डेरे,

 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ राजेराम घावटे यांनी आपला आवाज न्युज नेटवर्क शी बोलताना सांगितले की, “शाळेचे विद्यार्थी हे अभ्यासात प्रावीण्य मिळवत आहेतच परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कला गुणांनाही वाव मिळावा, यासाठीच खऱ्या अर्थाने वार्षिक स्नेह संमेलनांचे आयोजन केले जाते. सर्वच विद्यार्थी अभासातून पुढे मोठे यश मिळवतीलच असे समजणे चूक आहे, त्यांच्या इतर आवडी, रुची व कलांचाही पालकांनी विचार करायला हवा. न जाणो अशा कलागुणांमुळे शाळेचा एखादा विद्यार्थी भविष्यात मोठा अभिनेता होऊ शकतो. म्हणूनच संस्था नेहमीच अशा विद्यार्थ्यांना आपापल्या आवडीच्या क्षेत्रासाठी प्रोत्साहन देत आलीय.”
स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे जुन्या गाण्यांच्या आठवणी व त्यांना लावलेला आकर्षक साज हाच होता.
पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष दीपक घावटे, सचिव सविता घावटे, संचालक सुधीर शिंदे, शाळा समिती सदस्य प्रसाद घावटे, अमृता घावटे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

कार्यक्रमादरम्यान प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष येवले यांनी केले. अहवाल वाचन मुख्याध्यापिका रुपाली जाधव यांनी केले. सूत्रसंचालन रावसाहेब चक्रे तसेच शाळेच्या शिक्षिका शोभा अनाप व कविता वाडेकर यांनी केले. तर आभार संस्थेचे सीईओ प्रा डॉ नितीन घावटे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *