राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील पुण्यस्मरण दिनानिमित्त पुरस्कारांचे वितरण

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
९ जुलै २०२२

नारायणगाव


राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील संस्थेच्यावतीने दरवर्षी हलगी सम्राट केरबा पाटील यांचा पुण्यस्मरण दिन साजरा केला जातो. १५ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन आज रविवार दिनांक १० जुलै २०२२ रोजी नारायणगाव येथे करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील लोकनाट्य आणि कलाक्षेत्रातील गुणवंत कलावंतांना त्यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील पुरस्कारासाठी शाहीर विलास अटक आणि गायक पांडुरंग गायकवाड यांची निवड

राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील यांची हलगी संपूर्ण महाराष्ट्राच्या तमाशा परिचित आहे. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी कलेच्या क्षेत्रात प्रवेश केला होता. चंद्रकांत ढवळपुरीकर आणि दत्ता महाडिक यांच्या तमाशा फडात त्यांनी ४५ वर्षे पूर्ण केली तसेच चीन आणि भारत युध्दाच्या वेळी भारताच्या नेफा आघाडीवरती भारतीय सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी ते राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ मांग नारायणगाव यांच्या फडात हलगी वाद्यांचे काम केले होते.

हलगी वाद्याच्या स्पर्धेमध्ये त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यांच्या हातून अनेक शिष्य घडले . यावर्षीचा त्यांचा आज १५ वा पुण्यस्मरण दिन आहे .या निमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोकशाहीर विलास अटक आणि प्रसिद्ध गायक पांडुरंग गायकवाड यांना या वर्षीच्या हलगी सम्राट केरबा पाटील पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती संस्थेचे सचिव अमित आल्हाट आणि संचालक अनिल खुडे यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *