बुचकेवाडी प्राथमिक शाळेच्या लहान गट खो खो संघाला तृतीय क्रमांक

दि. १६/०१/२०२३
बुचकेवाडी

बुचकेवाडी : ना.यशवंतराव चव्हाण कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव २०२२/२३ अंतर्गत जिल्हा परिषद पुणे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत इ पहिली ते पाचवी लहान गट खो-खो मुले या स्पर्धेत बुचकेवाडी (वैष्णवधाम) ता.जुन्नर या शाळेने तृतीय क्रमांक मिळवला.

बालेवाडी (पुणे) येथे श्री.छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वर जिल्हास्तरीय कला क्रीडा महोत्सवातील स्पर्धा संपन्न झाल्या.स्पर्धेत जिल्ह्यातील १३ तालुक्यामधील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. बुचकेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रथमच सुरू झालेल्या लहान गट खो खो स्पर्धेत बाजी मारली. शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन मुलांना गौरवण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला नांगरे यांनी विद्यार्थ्याच्या यशात मोलाचे योगदान दिले.उपशिक्षक जाधव सर,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अजित बुचके, उपाध्यक्ष श्रीपत केदार तसेच पुनम डेरे ,गणेश पवार व इतर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांचे विशेष सहकार्य लाभले.यशस्वी विद्यार्थी व मुख्याध्यापक नांगरे मॅडम व शिक्षक यांचे माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके ,सरपंच सुदाम डेरे,उपसरपंच सुरेश गायकवाड,तंटामुक्तीचे अध्यक्ष दगडू पवार,सर्व पालक आणि ग्रामस्थांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *