४८ तासांचं सरकार केलं, ती बेईमानी नव्हती का? शंभूराज देसाईंचा अजित पवारांना सवाल

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ नोव्हेंबर २०२२


विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचे समोर आले आहे. पक्ष बदलणं गैर नाही परंतु आपण ज्या घरात वाढलो ते घरच उध्वस्त करायला निघणं ही बेईमानी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. मंत्री शंभुराज देसाई यांनी अजित पवारांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवारांनी ४८ तासांचं सरकार बनवलं ती बेईमानी नव्हती का? असा सवाल मंत्री शंभुराज देसाई यांनी केला आहे.

२०१९ मध्ये जे ४८ तासांचं सरकार तुम्ही केलं होतं, ती बेईमानी नव्हती का? तुमच्या पक्षाचे काही आमदार घेऊन तुम्ही पहाटेचा शपथविधी केला. तो करताना शरद पवार जे तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांची परवानगी घेतली होती का? त्यांना विचारलं होतं का? असा सवाल शंभूराज देसाईंनी अजित पवारांना केलाय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *