कल्याण नगर महामार्गावर टेम्पो उलटून दोघे जखमी; ८ म्हशी दगावल्या

दि. १०/१/२०२३
ओतूर


ओतूर : कल्याण नगर महामार्गावर असणाऱ्या गायमुखवाडी गावाजवळ ओतूरच्या दिशेकडून आळेफाटा दिशेने म्हशी घेऊन जाणाऱ्या टेंपो चालकाचा गाडीवरील ताबा सुटून टेंपो पलटी झाला आहे.

या अपघातात दोन जण जखमी झाले असून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना आळेफाटा येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.

यामध्ये आठ म्हशी दगावल्या आहेत तर दोन जखमी झाल्या आहेत.घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार दत्ता तळपाडे, संदीप भोते, शाम जायभाय, अमोल पालवे हजर झाले होते.या घटनेचा पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *