नारायण राणे, संजय राऊत वाद पेटला; ‘तू म्हणशील तिथं येतो!’

दि. ०७/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यातील वाद अधिकच वाढला आहे. संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप राणेंनी करून खळबळ उडवून दिली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एकटं फिरण्याचं आव्हान दिलं होतं. नारायण राणे यांनी राऊत यांचं हे आव्हान स्वीकारलं आहे. तू म्हणशील तिथे येतो. आताच संरक्षण सोडतो. बघुया काय करतो ते; असं खुलं आव्हानच नारायण राणे यांनी दिलं आहे. कुणाला चॅलेंज देतोय? एकट फिरा असं मला राऊत चॅलेंज देतो?. मी काही सरकारकडे संरक्षण मागितलं नाही. पोलिसांनी मला जबरदस्तीने मला संरक्षण दिलं आहे, असं राणे म्हणाले.मला पोलिसांनी जबरदस्तीने संरक्षण दिलं हे राऊतांना हे माहीत नाही. एक ना एक दिवस मी राऊत समोर संरक्षण सोडून जाईल. मी एकटाच जाईन. मला काही फरक पडत नाही. माझा इतिहास शिवसेना घडवण्याचा आहे. शिवसेना संपवण्याचा नाहीये. माझ्या वाटेला येऊ नको. असं खुलं आव्हान राणेंनी संजय राऊतांना दिलं आहे.

दरम्यान शिवसेनेच्या मुखपत्रातील एका अग्रलेखावरून नारायण राणेंविरुद्ध संजय राऊत असा वाद पेटला आहे.26 डिसेंबर रोजी सामनात जो अग्रलेख छापून आला होता तो नारायण राणेंच्या प्रचंड जिव्हारी लागला होता. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना राणेंनी संजय राऊतांवर पलटवार केला. तिथून हा वाद अधिक पेटत गेला. दोन्ही नेते मंडळींनी आपल्या बोलण्याच्या मर्यादा कधीच ओलांडल्या आहेत. एकूणच राजकीय परिस्थिती बघता राणेंविरुद्ध संजय राऊत हा वाद शमणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *