माझ्या बदनामीसाठी भाजपने ५ हजार कोटी खर्च केले – राहुल गांधी

३१ डिसेंबर २०२२


राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. त्यांची भारत जोडो यात्रा लवकरच उत्तर प्रदेशात दाखल होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहे. त्यातच आज राहुल गांधी यांनी माझ्या बदनामीसाठी भाजपने ५ हजार कोटी खर्च केले असा आरोप केला आहे.

राहुल गांधी म्हणाले की, माझी बदनामी करण्यासाठी भाजपने ५ हजार कोटी रुपये खर्च केले. याआधी मी यावर ९९ टक्के विश्वास ठेवत होतो. मात्र आता मला १०० टक्के खात्री आहे की, भाजपने बदनामीसाठी ५ हजार कोटी खर्च केले. मात्र सत्य लपविण्यासाठी कितीही खर्च करा किंवा कितीही कँपियन चालवा, काहीही होणार नाही, असंही राहुल यांनी म्हटलं आहे. मी बारकाईने निरक्षण केलं आहे. आता बदनामीसाठीचा खर्च ६ हजार कोटींवर पोहोचला आहे. आता आणखी थोडे खर्च करा. तुमच्याकडे पैशांची कमतरता नाही. मात्र त्याने आपल्याला काहीही फरक पडणार नाही, असंही राहुल यांनी ठणकावून सांगितलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *