नारायणगाव सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या सभासदांना ३ रुपये प्रती लिटर बोनस व १० टक्के लाभांश मिळणार

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२७ सप्टेंबर २०२२

नारायणगाव


नारायणगाव सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या दूध उत्पादक सभासदांना ३ रुपये प्रती लिटर बोनस व १० टक्के लाभांश देण्याचा ठराव वार्षिक सर्वसाधारण सभेत संमत झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन किशोर महादेव कोल्हे यांनी दिली. नारायणगाव सहकारी दूध उत्पादक संस्थेची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.२४) संस्थेचे चेअरमन किशोर कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सर्व विषय सर्वानुमते खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले. यावेळी युवा नेते अमित बेनके , पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, भाऊसाहेब देवाडे , विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक व विकास सोसायटीचे चेअरमन संतोष खैरे, व्हा. चेअरमन किरण वाजगे, सरपंच राजेंद्र मेहेर ,जंगल कोल्हे,रामदास अभंग ,गणेश वाजगे, राजकुमार कोल्हे ,रोहिदास केदारी,हेमंत कोल्हे ,संचालक विठ्ठल श्रीवत,जितेंद्र पाटे ,भगवान कोऱ्हाळे ,निलेश मेहेत्रे ,किरण तांबे ,संदीप डेरे ,बाबाजी लोखंडे ,योगेश वाघचौरे ,सविता तांबे ,सुगंधा डेरे ,आदी उपस्थित होते . सभेचे अहवाल वाचन व सूत्रसंचालन सचिव संदेश कोल्हे यांनी केले. आभार निलेश यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *