नारायण राणेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट

३१ डिसेंबर २०२२


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांचं निवासस्थान ‘शिवतीर्थ’ येथे जाऊन राणेंनी भेट घेतली. गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती.

राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. मागच्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये जवळीक वाढत आहे. भाजप नेते वारंवार राज ठाकरे यांची भेट घेत आहेत.

अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या घरी सदिच्छा भेट दिली होती. पण त्यावेळी नारायण राणे घरी नव्हते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट होऊ शकली नाही. यानंतर आज नारायण राणे यांनी राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *