पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनाही निमंत्रण असून राष्ट्रवादी चे स्थानिक नेते विरोध दर्शवून उगाच करतात बदनामी- नामदेव ढाके

रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड : दि १० जानेवारी
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या चऱ्होली, बोऱ्हाडेवस्ती, रावेत येथील नियोजित प्रकल्पातील सदनिकांची सोडत सोमवार ( दि.11) रोजी माजी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या नियोजित कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्टाचारानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती आहे. तरी, देखील राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सदनिका सोडतीच्या कार्यक्रमाला विरोध दर्शविला जात आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता असतांना भाजपाच्या सत्ता काळातच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. हे प्रकल्प 25 ते 30 टक्के पूर्णत्वावर आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक घटकाला लवकरात लवकर घर मिळावे, या उद्देशाने सदर प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे, असे सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक सोडतीसाठी फोन करतात. प्रत्येक्ष भेट घेऊन प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत कधी काढणार याची विचारणा करतात. लवकरात लवकर सोडत काढावी ही नागरिकांची इच्छा आहे. सोडतीत नंबर लागला की पैशांची जुळवा जुळव करता येते, त्यामुळेच नागरिकांचा विचार घेऊनच सोडत काढली जात आहे. सर्व बाबी सुरळीत असताना निव्वळ श्रेय वादाचा मुद्दा उपस्थित करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू आहे. राजशिष्टाचारानुसार जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत प्रमुख अतिथी म्हणून आहे. काल झालेल्या पत्रकार परिषदेत अजितदादा पवार यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. तसेच, त्यांना निमंत्रण पत्रिका पाठवली आहे. मा.ना. गिरीष बापट साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव डावलून राष्ट्रवादीने कुठला राजशिष्टाचार वापरला होता, हे त्यांनी अगोदर बघावं. मात्र, उगाचच चांगल्या कामाला विरोध करू नये. कदाचित राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम पत्रिका बघितली नसावी, त्यांनी ती बघावी. विनाकारण गोर गरिबांना मिळणाऱ्या घरांना तरी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध करू नये, असे म्हणत पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपाचे खंडण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *