एकनाथ पवार सोशल फाउंडेशन आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 347 जणांनी केले रक्तदान

पिंपरी : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त एकनाथ  पवार सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित पुर्णानगर येथील उद्यानात रक्तदान व मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी 347 जणांनी रक्तदान केले. तर 530 जणांनी मोफत आरोग्य तपासणी केली.

या शिबिराचे उद्घाटन भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, सुप्रिया चांदगुडे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, निलेश नेवाळे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे, पोपट हजारे, अजय पाताडे, संतोष ठाकूर, गोरख पाटील, महादेव कवितके, बाळासाहेब गंगावणे, श्रीकांत कदम, हरजित सिंग बारडा, अनिकेत बाबर, रुपल माने, भिमाजी पानमंद, सुदीप नायर, निलेश सुंबे, सुनील डोमाटे, शशिकांत जगताप, अनिल माने, सागर देसाई, संदीप मंगवडे, पांडुरंग विभुते ,अनिल नेवाळे, नामदेव निकम , महेंद्र शेळके, सौरभ पाटणकर, निलेश होलावळे, उद्धव शेळके, रवींद्र खैरनार, दिगंबर उगले, चक्रधर फाजगे, तात्या भोसले ,प्रमोद कोरडे, कविता हिंगे, दिपाली धनवकर, प्रीती कुलकर्णी ,वैशाली खामकर , सुनिता जगताप, माधुरी भटकर, मयुरी शितोळे, तृप्ती चव्हाण आदीजण उपस्थितीत होते.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यानात सकाळी 9 ते 6 यावेळेत रक्कदान व आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी ब्लड प्रेशर (बीपी), शुगर, नेत्र तपासणी, हिमोग्लोबल (एचबी), हाडे ठिसूळता (सांधे), फिटनेस तपासणी करण्यात आली. पिंपरी चिंचवड ब्लड बॅंक आणि रेड क्लब बॅंकेने रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.

यावेळी एकनाथ पवार म्हणाले की, राज्यात रक्ताचा तुटवडा भासू नये, वेळप्रसंगी मागेल त्याला रक्त उपलब्ध व्हावे याकरीता भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू केला आहे. कोरोनाच्या काळात निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदानाचा उपक्रम खुपच महत्त्वाचा आहे. वाढदिवसाला उत्सवी स्वरूप न देता रक्तदानासारख्या पवित्र कार्यामधून नागरिकासह कार्यकर्त्यांनी आज रक्तदान केले आहे. दिवसेंदिवस वाढणारे अपघात, विविध शस्त्रक्रिया व इतर कारणांनी रुग्णांना नेहमीच रक्ताची गरज भासते. पण अनेकदा रुग्णालयात आवश्यतेनुसार रक्ताचा साठा उपलब्ध नसतो. रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *