राज्यात दहशत निर्माण करणाऱ्या कोयता गँगवर मोक्का लावा – अजित पवार

२० डिसेंबर २०२२


हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कोयता गॅंगचा मुद्दा उपस्थित केला आहे. राज्यातील कोयता गँगची दहशत मोडून काढण्यासाठी या गँगमधील गुन्हेगारांना मोक्का लावा, त्यांना तडीपार करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

पुण्यासह राज्याच्या अनेक शहरे आणि उपनगरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. ही गँग रात्री-अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता परजत फिरते. महिलांचे दागिने लुटणे, चोरी, लुटमारी करणे, गाड्यांची मोडतोड, जेवणाचे बिल न भरता हॉटेलमध्ये तोडफोड करण्यासारखे हिंसक कारवाया करते. राज्यातील अनेक शहरातील नागरिक कोयता गँगच्या दहशतीखाली जगत आहेत.कोयता गँगचे वाढते लोण रोखण्यासाठी, राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा. त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *