आयुक्तांनी आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त अनधिकृत फलक काढण्याचे दिले आदेश. लांडगे यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर दिले प्रत्युत्तर

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२७ नोव्हेंबर २०२१

पिंपरी


 

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर नव्हे तर ग्रामीण भागातही त्यांच्या कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी प्रेमापोटी शेकडो फलक लावले. पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांनी संपूर्ण शहरात बॅनर आणि पोस्टर लावू शकत नाही. नियम हे सर्वांसाठी सारखेच असले पाहिजे. त्यामुळे मोठे फलक सोडून रस्त्यावर व फुटपाथवर लावलेले फलक काढून टाकावेत असे सांगितले.

फलक लावणार्यांना फलक काढून टाकण्यास सांगावे. व जर पुढील सहा तासात फलक काढले नाही तर कृपया महापालिकेने काढून टाकावेत. फलक काढताना फाडू नका, व्यवस्थित, सावधानतेने काढावा. फुटपाठवरील फलक काढण्यासाठी अगोदर संधी द्यावी आणि सक्त ताकीदही द्यावी.

आयुक्तांनी क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, बीट अधिकाऱ्यांना फलक काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ही बातमी शहरभर पसरली व वेगवेगळ्या ग्रुपवर व सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले. काही तिखट तर काही भावनिक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

आयुक्त साहेब चौका चौकातील बॅनर काढाल पण पिंपरी चिंचवडकरांच्या मनातील महेश दादा कसा काढणार ?

महेश लांडगेच्या ‘ब्रँडिंग ‘ ची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धास्ती.

अजित दादा पवार २७ नोव्हेंबरला विविध कार्यक्रमांसाठी पिंपरी-चिंचवड शहरात येणार त्यामुळे महापालिका आयुक्तांचे आदेश:-

आमदार महेश लांडगे यांचे शहरातील सर्व काढून टाका.

बारामतीचे दादा येणार म्हणून पिंपरी-चिंचवडच्या दादांच्या फ्लेक्स काढण्याचे आदेश.

आयुक्त साहेब, प्रशासनाला कामाला लावून शहरातील बॅनर काढाल पण पिंपरी-चिंचवडकरांचा हृदयातील महेश दादाला तुम्ही कसे काढणार ?

राजकीय दबावापोटी तुमची जबाबदारी पार पडल्याबद्दल THANK YOU आयुक्त साहेब..!

अशाप्रकारचे भावनिक व काहीशा तिखट प्रतिक्रिया आमदार महेश लांडगे यांच्या चाहत्यांकडून शहरातील विविध व्हाट्सअप ग्रुपवर आणि सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *