आम्ही सूडाचे राजकारण करत नाही, आम्ही विरोधकांवर अन्याय करणार नाही – देवेंद्र फडणवीस

२० डिसेंबर २०२२


विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना भाजपच्या आमदारांना निधी मिळाला नाही असा आरोप देवेंद्र फडणवीस केला आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कामाच्या स्थगितीवरून विधानसभेत खडाजंगी झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर पलटवार केला. त्यांनी म्हटले की, अजित पवार उपमुख्यमंत्री असताना तुम्ही कामे रोखली होती. अडीच वर्षात भाजपच्या आमदारांना निधी मिळाला नाही. आम्ही सूडाचे राजकारण करत नाही. आम्ही विरोधकांवर अन्याय करणार नाही, आवश्यक ती कामे सुरू झाली आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *