इंद्रधनू ग्रुपने आयोजित केलेल्या मीनथडी जत्रेस नारायणगावकरांचा उस्फूर्त प्रतिसाद

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२३ एप्रिल २०२२

नारायणगाव


इंद्रधनू ग्रुप, जिजामाता पतसंस्था व सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेच्या संस्थापिका राजश्री बोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या इंद्रधनू ग्रुपच्या मीनथडी जत्रेला नारायणगावकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. मिनथडी जत्रेचे उद्घाटन ब्रह्मकुमारी संगीता बेहेनजी यांच्या हस्ते तर राजश्री बेनके, सुमित्रा शेरकर, योगीता शेरकर, हर्षलता शहा, नेहा शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. इंद्रधनू ग्रुपला विनोद सेल्सचे पराग शहा व टीव्हीएस ऑटो चे राहुल पापळ यांचे सौजन्य लाभले.

विविध खाद्यपदार्थ, जिवनावश्यक वस्तूंच्या स्टॉलला प्रतिसाद

इंद्रधनुग्रुपचे हे १२ वे वर्ष असून ८०० महिला सदस्य आहेत. महिलांच्या कलागुणांना खुले व्यासपीठ निर्माण व्हावे या उद्देशाने इंद्रधनू ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, नवीन व्यवसाय, रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन मनोरंजन, प्रबोधन व प्रशिक्षणासह स्वयंसिद्ध बनविणे हा खरा इंद्रधनू ग्रुपचा हेतू आहे. मीनथडी जत्रेत एकूण ७० स्टॉल होते. बुधवार दि.२१ व गुरुवार २२ रोजी दोन दिवस पार पडलेल्या मीनथडी जत्रेत पंधरा ते सोळा लाखांची उलाढाल झाली असल्याचे राजश्री बोरकर यांनी सांगितले.


मीनथडी जत्रेचे स्वरूप मोठे करावयाचे असल्याने इंद्रधनू ग्रुपला आर्थिक मदतीचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमास संस्थापिका राजश्री बोरकर, अध्यक्षा भारती खिंवसरा, उपाध्यक्षा पुष्पा जाधव, संचालिका शीतल ठुसे, ज्योती गांधी, सुरेखा वाजगे, निवेदिता डावखर, निर्मला गायकवाड, मनीषा बोरा, जुई बनकर, प्रांजल भुतडा, स्मिता लोणकर, सुनीता बोरा उपस्थित होत्या. यावेळी अनेकांनी येथील खाद्यपदार्थांवर ताव मारला व विविध वस्तूंची खरेदी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *