राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस ठरणार वादळी

२० डिसेंबर २०२२


महाराष्ट्र विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून आज विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी देखील चांगलीच कंबर कसली आहे. सोमवारी, पहिल्या दिवशी सीमा प्रश्नाबाबत विधानसभा आणि विधान परिषदेत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली होती.

दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झाले आहेत. राज्यातील विविध मुद्द्यांवर सरकारला घेरल्याने यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. यातच बेळगावात कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करत अटक केली. यामुळे याचे पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उमटण्याची शक्यता आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *