चीननंतर अमेरिकेने बनवला कृत्रिम सूर्य

१६ डिसेंबर २०२२


अमेरिकन शास्त्रज्ञांनी ‘कृत्रिम सूर्य’ बनवला आहे. हा मूळ सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा १०० पट जास्त गरम असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने १३ डिसेंबर २०२३ रोजी ही घोषणा केली आहे. याआधी चीननेही कृत्रिम सूर्य बनवला होता. या ऊर्जेचा वापर भविष्यात ऊर्जा संकट दूर करण्यासाठी केला जाईल. पण यासाठी आणखी वेळ लागणार आहे.

न्यूक्लियर फ्यूजनला ‘कृत्रिम सूर्य’ असं म्हटलं जातं. अमेरिकेने पहिल्यांदाच न्यूक्लियर फ्यूजन यशस्वीपणे पार पडलं आहे. कॅलिफोर्नियातील लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीच्या नॅशनल इग्निशन फॅसिलिटीमध्ये अमेरिकन शास्त्रज्ञांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *