महाविकास आघाडीच्या महामोर्चाला परवानगी – देवेंद्र फडणवीस

१६ डिसेंबर २०२२


भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांबद्दल करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा महामोर्चा उद्या, १७ डिसेंबरला मुंबईत काढण्यात येणार आहे. या महामोर्चाला परवानगी दिली जाणार का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

फडणवीस म्हणाले, जो काही मोर्चा आहे तो शांतपणे व्हावा, त्यासाठी जी काही परवानगी आहे ती दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लोकशाही पद्धतीने कोणाला विरोध करायचा असेल, तर ते विरोध करतील. कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहील एवढ्या पुरतं सरकारचा त्यामध्ये हस्तक्षेप असेल.याशिवाय मोर्चाला परवानगी मिळालेली नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे, यावर फडणवीस म्हणाले, मला असं वाटत नाही माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीच्य मोर्चाच्या मार्गासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्यांनी सांगितलेलाच मार्गच जवळपास मान्य केलेला आहे. त्यामुळे मला वाटत नाही की काही परवानगीची अडचण आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *