अखेर महावितरण प्रशासनाला जाग; केबलचे काम सुरू- आमदार महेश लांडगे यांचा दणका…

  • भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा
  • पुणे- नाशिक महामार्गाच्या पूर्वेकडील भागात वीज समस्या सुटणार

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि १० मे २०२१
भोसरी परिसरातील पुणे-नाशिक महामार्गाच्या पूर्व भागात वीज समस्या निकालात काढण्यासाठी आवशक्यता असलेल्या भूमिगत केबलचा पुरवठा अखेर महापालिका प्रशासनाने केला. त्यामुळे आता या भागातील वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे.
पुणे-नाशिक महामार्गाच्या पूर्वेकडील भागात केलेल्या खोदकामामुळे भूमिगत वीजवाहिनी तुटली. परिणामी, गेल्या अनेक दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत होता. ही बाबत लक्षात आल्यानंतर भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी महापालिका बीआरटी विभागाला खडे बोल सुनावले. त्यामुळे केबल उपलब्ध करण्यात आली. सदर केबल महावितरण प्रशासनाला सूपुर्त करण्यात आली.
यावेळी बीआरटी विभागाचे उपअभियंता श्री. साळी, कनिष्ट अभियंता श्री. बेळगावकर, महावितरण कार्यकारी अभियंता श्री. गवारी, अति कार्यकारी अभियंता श्री. चव्हाण उपस्थित होते.
महापालिका बीआरटी विभागामार्फत सुरू असलेल्या कामामुळे केबलचे नुकसान झाले. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला महावितरण प्रशासनाने कल्पना दिली होती. मात्र, संबंधित ठेकेदार टाळाटाळ करीत होता. दरम्यान, महावितरण अधिकारी आणि मनपा अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी ही बाबत आमदार लांडगे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर तात्काळ कार्यवाही करण्यात आली.