मांजरी महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी 
१७ ऑक्टोबर २०२१

ओझर

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने वाचन प्रेरणा दिवस

मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाचन संस्कृतीचा विकास होऊन विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी केले.

महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.केतन डुंबरे यांनी वाचन प्रेरणा दिवसाचे महत्व नमूद करून डॉ. कलाम यांच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जिवनपटाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच विविध विषयांवरील पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून विविध दर्जेदार ई-पुस्तके वाचनासाठी मोफत स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल प्रा.केतन डुंबरे यांनी सदर उपक्रमांचे आयोजन केले होते.

याप्रसंगी डॉ.सतिश पाटील, प्रा.मनिषा रणावरे, प्रा.स्वाती गाडे, प्रा.रविंद्र मोजे, प्रा.आश्विनी बामणीकर, सोमनाथ गलांडे, अजित गुंड उपस्थित होते.

Celebrating Reading Inspiration Day at Manjiri College
मांजरी महाविद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *