बेल्ह्यात विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत

रामदास सांगळे
विभागीय संपादक
५ ऑक्टोबर २०२१

जुन्नर

बेल्ह्यात विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत

बेल्हे : राज्यातील शाळांची दीड वर्ष नंतर घंटा वाजली असून सर्व काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.काही शाळा सोमवारी सुरू झाल्या तर काही मंगळवारी. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत होते.शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळांनी निर्जंतुकीकरण करण्यात आले असून सर्व शिक्षकांचे लसीकरण ही करण्यात आले आहे.

दीड वर्षा नंतर गजबजल्या शाळा

शाळेच्या पहिल्या दिवशी बेल्हे (ता. जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल अँड जुनियर कॉलेजच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. अनेक दिवसांनी शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत होते.तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याचं आवाहन प्राचार्या विद्या गाडगे यांनी केले.या वेळी कोरोनाच सावट जावो अशी प्रार्थना विद्यार्थी व शिक्षकांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *