भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीचे ७२ वे शतक

१० डिसेंबर २०२२


भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ११३ धावांची खेळी करत शतकांचा दुष्काळ संपवलाय. विराटनं ऑगस्ट २०१९ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील अखेरचं शतक ठोकलं होतं. त्यानंतर तब्बल १ हजार २१४ दिवसानंतर विराटच्या बॅटमधून शतक पाहायला मिळालंय.

पहिल्या डावामध्ये भारताचा सलामीवीर इशान किशन आणि विराट कोहलीने दमदार फटकेबाजी करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. इशानने द्विशतक झळकावलं तर विराटने ७२ वं शकतं झळकावलं. विशेष म्हणजे आता सर्वाधिक शतकांच्या यादीत विराट केवळ सचिन तेंडुलकरच्या मागे आहे. विराटने ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टींगच्या ७१ शतकांचा विक्रम मोडीत काढला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *