कोणी कितीही यात्रा काढल्या तरी लोक विकासाच्या मागे उभे राहतात हे गुजरातच्या निकालातून दिसून आले – शंभूराज देसाई

०९ डिसेंबर २०२२


गुजरात निवडणुकीत भाजपाने आपला इतिहासातील सर्वात मोठा विजय प्राप्त केला आहे. भाजपाने आपले सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. भाजपाने १५७ जागांवर विजय मिळवला आहे. तर, काँग्रेसला केवळ १७ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. हा निकाल देशाला २०२४  निवडणूकीसाठी दिशा देणारा आहे, असे मत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.

देसाई म्हणाले, या विजयानंतर मोदींच्या विचारांच्या पाठीशी जनता उभी रााहिल्याचे दिसून आले आहे. कोणी कितीही यात्रा काढल्या तरी लोक विकासाच्या मागे उभे राहतात, हे या निकालातून दिसून आले आहे, असं म्हणत देसाईंनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधला आहे.

देशाला दिशा देणाऱ्या गुजरातच्या निकालाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दृष्टीकोन, विचारांवर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभेच्या २०२४ सालच्या निवडणुकीला या निकालाने दिशा मिळाली. विविध राज्ये आणि देशही अपेक्षित विकास आणि प्रगतीत अव्वलस्थान गाठत असल्याने नरेंद्र मोदींच्या पाठीशी जनता उभी राहिली असल्याचा विश्वास मंत्री शंभूराज यांनी व्यक्त केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *