आमदार महेश लांडगे यांना ‘ स्व. बी. के. कोकरे पुरस्कार ’

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०६ जून २०२२

पिंपरी


रुपीनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानतर्फे भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना ‘स्व. बी. के. कोकरे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात आले. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोस्थव व शोभा यात्रा आयोजित केली होती. त्यावेळी प्रा. राम शिंदे, बाळासाहेब दोलतोडे, हिंदू एकताचे मिलिंद एकबोटे, ऑल इंडिया धनगर समाजचे अध्यक्ष प्रवीण काकडे यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये डॉ. राम तांबे (वैद्यकीय क्षेत्र), ॲड. राजेश पुणेकर (कायदेतज्ञ ), शांताराम दगडू भालेकर (सामाजिक), सुबोध गलांडे (शैक्षणिक ), सागर चव्हाण (गोरक्षण), निसर्गराजा मित्र जीवांचे (पर्यावरण रक्षण) आदींचा समावेश आहे.

राज्याचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्याहस्ते गौरव

प्रा. राम शिंदे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. परंतु, केवळ जागा उपलब्ध करुन चालणार नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून आमची अनेक बांधव पोट भरायला आलेली आहेत. ते एक-दोन कोटी रुपये खर्च करु  शकत नाही. आपल्यावर वर्गणी गोळा करुन खर्च करण्याची वेळ येवू नये. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही प्रा. शिंदे यांनी केले.

रुपीनगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्ताने या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज मला स्वर्गीय बी. के. कोकरे विशेष सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. ज्या पद्धतीने बी. के. कोकरे यांचे धनगर समाजासाठी काम केले होते, त्याच पद्धतीचे का विधानसभेत गाजवण्यासाठी प्रयत्नशील राहील.

रुपीनगर परिसरात शोभा यात्रा…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रुपीनगर, तळवडे भागात शोभायात्रा काढण्यात आली. उंट-घोउ, गज नृत्य, ढोल-ताशा पथक, हलगी वादन या यात्रेचे खास आकर्षण होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *