पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्धाटन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०७ मार्च २०२२

पिंपरी


पिंपरी चिंचवड परिसरातील पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्गीकेचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे येथून करण्यात आले. यावेळी, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीष बापट, महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्यासह पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.

पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्गीकेचे ऑनलाईन उदघाटनानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी – नगरसेवक तसेच मेट्रो अधिकारी यांनी पिंपरी मेट्रो स्टेशन येथे सोहळयाचे स्वागत केले. दरम्यान, पिंपरी ते फुगेवाडी परत फुगेवाडी ते पिंपरी असा मेट्रो प्रवासाचा आनंद घेतला. यावेळी पिंपरी येथील स्थानकावर उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विधी समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सविता खुळे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापूरे, जैव विविधता व व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, प्रभाग अध्यक्ष शैलेश मोरे, सुरेश भोईर,  राजेंद्र लांडगे,  कुंदन गायकवाड, अभिषेक बारणे,सागर आंगोळकर, प्रभाग अध्यक्ष विकास डोळस,नगरसदस्य संदिप कस्पटे, बाबासाहेब ‍त्रिभुवन, केशव घोळवे, तुषार हिंगे, एकनाथ पवार, संजय नेवाळे, शत्रुघ्न काटे, हर्षल ढोरे, शितल शिंदे, माऊली थोरात, बाबु नायर, नगरसदस्या सुनिता तापकीर, भिमाताई फुगे, निर्मला कुटे, कलम घोलप, झामाबाई बारणे, शारदा सोनवणे, मनिषा पवार, योगीता नागरगोजे, सिमा सावळे, आशा धायगुडे – शेंडगे,  सुमन पवळे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *