पिंपरी-चिंचवड महापालिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे राजकारण

०७ डिसेंबर २०२२

पिंपरी


पुढील काही दिवसांत काही अंशी का होईना, पाण्याचा प्रश्न सुटेल अशी स्थिती आहे. तरीही याचा राजकीय लाभ घेण्यासाठी कारभाऱ्यांमध्ये पत्रकबाजी व श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. परिणामी, महापालिकेची आगामी निवडणूक पाणी प्रश्नाभोवतीच लढली जाण्याची चिन्हे आहेत. मात्र, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच पाणी प्रश्नावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. आंद्रा धरणातून दैनंदिन शंभर दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाले आहे. त्यावर चिखली जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून वितरणाच्या चाचण्या झाल्या आहेत. केवळ उद्घाटन बाकी आहे. शिवाय, भामा-आसखेड धरणातील पाणी आणण्यासाठी जॅकवेल उभारणीच्या कामाचे भूमिपूजन करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *