चोरट्यांच्या नजरा आता नळाच्या मीटरवर

०६ डिसेंबर २०२२

चिखली


महापालिकेकडून प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा केला जातो व पाणीपट्टी आकारणीसाठी प्रत्येक ग्राहकाच्या नळाला मीटर लावण्यात आले आहेत , परंतु या मीटरच्या सुरक्षेविषयी नागरिक जागरूक नसल्याने मीटर चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे
पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला पाणी किती वापरले याचे मोजमाप केले जाते व ते मोजमाप करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक प्रशासनाकडून प्रत्येक ग्राहकासाठी विविध कंपन्यांचे मीटर अतिशय अल्प किमतीमध्ये पुरवले जात आहेत , या मीटरमुळे शहराला होणारा पाणीपुरवठा व गळती झालेले पाणी आणि प्रत्येक नागरिकाने वापरलेले पाणी यांचे गणित जुळवले जाते.

नागरिकांना महापालिका प्रशासनाकडून अल्पदरामध्ये मीटर उपलब्ध करून दिले जात असल्याने या मीटरची किंमत समजत नाही मीटरच्या सुरक्षेसंदर्भात नागरिक जागरूक नसल्याने पाण्याचे मीटर चोरी जाण्याच्या घटना वाढल्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *