म्हणून बेळगाव दौरा केला रद्द, शंभूराज देसाई यांनी दिली माहिती

०६ डिसेंबर २०२२


कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे महाराष्ट्रातील मंत्र्यांचा आजचा बेळगाव दौरा तुर्तास रद्द करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली. बेळगावच्या लोकांना भेटायचं आहेच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमांना गालबोट लागू नये, या उद्देशानं हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे,अशी माहिती त्यांनी दिली. चंद्रकांत पाटील आणि मी या विषयावर चर्चा करू आणि लवकरच बेळगावमध्ये जाण्याचा दिवस निश्चित करू,असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलं.

या दौऱ्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, आम्ही आमच्या भेटीची तारीख लवकरच ठरवू. बेळगावमध्ये आम्ही मराठी भाषिक लोकांशी बोलू आणि त्या ८५० गावांतील मराठी भाषिकांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे पॅकेज देऊ इच्छितात त्यावर चर्चा करू; असे देखील कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *