विधिमंडळ हिवाळी अधिवेशनासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती

०६ डिसेंबर २०२२

पिंपरी


विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे लवकरच सुरू होत आहे. त्यात उपस्थित होणाऱ्या शहरासंबंधी व महापालिका कामकाजासंदर्भात माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासक शेखरसिंह यांनी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यांचे प्रतिनिधित्व अनुक्रमे आमदार अण्णा बनसोडे, आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे करीत आहेत.

उमा खापरे विधान परिषदेच्या सदस्या आहेत. त्यांच्यासह अन्य विधानसभा व विधान परिषद सदस्य शहरासंदर्भातील तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव व इतर प्रश्न उपस्थित करू शकतात. त्यामुळे प्रशासकीय विषयांसाठी उपायुक्त चंद्रकांत इंदलकर व सहायक आयुक्त वामन नेमाणे आणि अभियांत्रिकी विषयांसाठी शहर अभियंता मकरंद निकम व उपअभियंता देवेंद्र बोरावके यांची अनुक्रमे समन्वय व सहायक समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, अधिवेशन काळात प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रशासकीय व अभियांत्रिकी कामांसंदर्भात महापालिकेशी समन्वय साधून माहिती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सहायक आयुक्त रविकिरण घोडके यांच्यावर आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *