शासन आपल्या दारी उपक्रम अण्णापूर येथे ७ डिसेंबर रोजी होणार : निलेश वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते

रवींद्र खुडे
विभागीय संपादक
०६ डिसेंबर २०२२

शिरूर


शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत शिरूर तालुक्यातील मौजे अण्णापुर येथे बुधवार दि. ०७/१२/२०२२ रोजी, सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत एक दिवसीय “महा राजस्व अभियान” राबविण्यात येणार असल्याची माहिती, सामाजिक कार्यकर्ते व आयोजक निलेश वाळुंज यांनी दिली. त्यात अण्णापुरसह रामलिंग, सरदवाडी, कर्डेलवाडी, निमगावभोगी, आमदाबाद, म्हसे-बुद्रुक व मलठण या गावांचा समावेश असेल.
त्यामुळे या गावातील सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ज्या योजनेची व कागदपत्रांची माहिती हवी असेल, अशा विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक फलकावर (फ्लेक्सवर) व प्रसिद्धी पत्रकात योजनेच्या पुढे दिलेले आहेत.
या कार्यशाळेत पुढील विषयांचा समावेश असेल :-
१] निराधार वयोवृद्ध, विधवा यांस मासिक १०००/- रू. पेन्शन योजना.
२] निराधार बालक पेन्शन योजना (० ते १८ वर्ष) वयोगट मासिक ११००/- रु. पेन्शन.
३] रेशन कार्ड संबंधित सर्व कामे.
४] अपंग दिव्यांग संबंधित योजना अपंग दाखले इत्यादी.
५] प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना. ६] उत्पन्नाचे व इतर दाखले तसेच सेतू कार्यालय संबंधित कामे.
७] आधार कार्ड संबंधित कामे नवीन आधार कार्ड आधार दुरुस्ती मोबाईल लिंक करणे.
८] टपाल पोस्ट खात्यासंबंधीत विविध योजना. रुपये ३९९/- मध्ये दहा लक्ष रुपये अपघाती विमा संरक्षण इत्यादी. ९] कृषी विभागासंबंधीत योजना.
१०] पंचायत समिती संबंधित योजना. ११] महावितरण संबंधित योजना. नवीन वीज जोडणी, वीज देयक संबंधित दुरुस्ती महावितरण संबंधी समस्या इत्यादी.
१२] गाव नकाशा प्रमाणे अतिक्रमण व बंद झालेले गाडी रस्ते/पाणंद रस्ते/ शेतावर जाण्याचे पाय मार्ग मोकळे करणे.
१३] एका महिन्याच्या वर प्रलंबित असणारे फेरफार निकाली काढणे. १४]अर्धन्यायिक प्रकरणे निर्गत करणे.
१५] भूमी अभिलेख मोजणी कार्यालय संबंधित कामे.
१६] आरोग्य विभागाच्या योजना. १७ ]वनविभागा संबंधित कामे.
१८] मतदार नोंदणी मतदान कार्ड संबंधित कामे.
अशा विविध योजना शासनाच्या थेट गाव स्तरावर मिळणार असून, याचा लाभ सर्वांनी घेणे आवश्यक आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *