अखेर निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी..

भाजप कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांच्या मागणीला यश

रोहित खर्गे
विभागीय संपादक

अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांची प्रस्तावाला मान्यता

पिंपरी दि.१२ फेब्रुवारी
निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा या स्मारकाच्या स्थापनेपासुन वाऱ्यावरच होती याठिकाणी तातडीने २४ तासासाठी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली होती मागणीच्या प्रस्तावाची दखल घेत अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी याला मान्यता देत तातडीने ३ सुरक्षारक्षक नेमण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे हातागळे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

निगडी बसस्थानकाच्या शेजारीच असणाऱ्या या उद्यानात प्रवाशांची नेहमीच उठबस असते पण याच ठिकाणी दिवसा व रात्री काही मद्यपी वाटसरू येथे बिनधास्तपणे दारू पितात, उद्यानात दारूच्या बाटल्या इतरत्र पडलेल्या असतात, याठिकाणी स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर आहे, रात्रीही बऱ्याच उशिरापर्यंत काही प्रेमी युगुल याठिकाणी बसलेले असतात, महत्वाचं म्हणजे महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या मागेच त्याच चौथाऱ्यावर काही मनोरुग्ण बसलेले असतात जमा केलेले अन्न ते त्याठिकाणीच बसुन खाताना दिसतात त्यामुळे या पुतळ्याचे पावित्र्य भंग होत आहे, उद्या जर त्यांनी या पुतळ्याला काही इजा पोहचविली किंवा काही विटंबना केली तर सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन याची संपुर्ण जबाबदारी आपली असेल, आयुक्तांनाच याचे उत्तर देणे बंधनकारक असेल याचाही आयुक्तांनी विचार करणे महत्वाचे आहे ही गंभीर बाब हातागळे यांनी उजेडात आणुन यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर, सुरक्षा विभाग व उद्यान विभागाकडे तातडीने सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी करत पाठपुरावा केला होता.

महाराणा प्रताप उद्यानात सुरक्षारक्षक नेमण्याबाबत उद्यान व सुरक्षा विभागाने एकमेकांकडे बोट दाखवत चालढकल करण्याचा प्रयत्न केला पण आक्रमक मागणी व सततचा पाठपुरावा यामुळे अतिरिक्त आयुक्त यांनी या उद्यानात २४ तासासाठी ३ सुरक्षारक्षक तातडीने नेमण्याचे आदेश दिले आहेत.

महाराणा प्रताप उद्यानाच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.