मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर;कोणत्या रुपात मदत करणार सर्वांचे लक्ष??

राजू थोरात तासगाव सांगली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सांगली जिल्हा दौरा निश्चित झाला असून ते सोमवारी उद्या 2 ऑगस्टला सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
सकाळी सव्वा दहा वाजता पलूस येथे कृष्णा वेरळा मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर स 10-45 वाजल्यापासून ते अंकलखोप, भिलवडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज व सांगली येथे पूर परिस्थितीची पाहणी मोटारीने पाहणी करणार आहेत..तसेच पूरग्रस्तांच्या भेटीगाठी घेऊन दुपारी 1 वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पूर परिस्थिती बाबत आढावा बैठक घेणार आहेत…
दुपारी 2 वाजता बुधगाव ता मिरज येथील विमानतळावरून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
मुख्यमंत्री यांच्यासमवेत पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने, खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर, आमदार मोहनराव कदम, तासगाव कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील,जतचे आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण अण्णा लाड, शिराळाचे आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री कवठेमहांकाळ शिवसेना नेते अजितराव घोरपडे, शिवसेना संपर्क नेते नितीन बानगुडे पाटील सर, काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील, सांगली कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील,मुख्यमंत्री यांचे स्वीह्य सहायक मिलिंद नार्वेकर ही उपस्थित राहणार आहेत.
पूरग्रस्त कुटुंब, दुकानदार,शेतकरी, व इतर रहिवाशी यांना सरकारकडून 1 रूपाया मदत मिळाली नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्त कुटुंब, शेतकरी, व्यापारी यांना कोणती मदत देणार किंबहुना कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे..
तर एकीकडे सांगली जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे.
तर पुन्हा कोयना व नवजा व इतर धरणातुन पाणी सोडल्यामुळे पुन्हा नद्यांची पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *