युट्यूबने हटवले तब्बल ५६ लाख व्हीडिओ

०१ डिसेंबर २०२२


व्हीडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबने जवळपास ५६ लाख व्हीडिओज हटवले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याने कंपनीकडून ही कारवाई करण्यात आले आहे. हटवण्यात आलेल्या ५६ लाखांपैकी एकट्या भारतातील १७ लाख व्हीडिओ आहेत. युट्यूबने २०२२ च्या आपल्या जुलै-सप्टेंबरच्या रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. युट्यूबने गेल्या तिमाहीत भारतातून क्रमशः १३ लाख आणि ११ लाख व्हीडिओ हटवले होते.

जागतिक स्तरावर युट्यूबने कंपनीच्या पॉलिसीचे उल्लंघन केल्याने ५६ लाख व्हीडिओ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने माहिती दिली की, मशीनद्वारे डिटेक्ट करण्यात आलेल्या ३६ टक्के व्हीडिओंवर त्वरित कारवाई करण्यात आळी. या व्हीडिओंना एकही व्ह्यूज नव्हते. ३१ टक्के व्हीडिओ १ ते १० व्ह्यूज होते. याशिवाय, नियमांचे उल्लंघन केल्याने जवळपास ७३.७ कोटी कॉमेंट्स देखील डिलीट करण्यात आल्या आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *