दिव्यांगांच्या स्वप्नांना मिळाले पंखांचे बळ; जुन्नर तालुक्यातील दिव्यांगांना तीन चाकी सायकलचे वितरण

जुन्नर प्रतिनिधी
२९ नोव्हेंबर २०२२


डिसेंट फाउंडेशन जुन्नर, पुणे व आय डी बी आय ट्रस्टशिप सर्विसेस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आज जुन्नर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकलचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यात्मिक व प्रेरणादायी वक्ते ह. भ. प. पंकज महाराज गावडे बोलत होते. आज या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून दिव्यांगांना तीन चाकी सायकलचे वितरण केल्याने खऱ्या अर्थाने ते आता स्वयंपूर्ण होतील. त्यांच्यातील कला – गुण ,कौशल्य व बुद्धिमत्ता ओळखून त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले तर आज आपल्या भारत देशातील अडीच कोटी दिव्यांग बांधवांची ऊर्जा राष्ट्र कार्यासाठी उपयोगात येईल आणि त्यांच्याही चेहऱ्यावर स्वावलंबनाचे समाधान दिसेल व ते स्वाभिमानाने समाजात आपले जीवन व्यतीत करतील. डिसेंट फाउंडेशनने दिव्यांगांना प्रकाशात येण्याचे बळ दिलेलं आहे तसेच स्वयंरोजगाराच्या अनेक उपक्रमामधून स्वाभिमानाचही बळ द्यावं.

शारीरिक विकलांगता ही बऱ्याचदा शारीरिक आघात किंवा नैसर्गिक आघातामुळे येते. परंतु मानसिक विकलंगता ही मात्र जास्त वाढत चाललेली आहे. आणि म्हणून मनाची विकलांगता दूर करण्यासाठी लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
– डॉक्टर संतोष सहाणे ( कृषी तज्ञ )

आज आय डी बी आय बँकेचा सीएसआर फंड आम्ही जरी दिला असला , तरी ते आमचे सामाजिक कर्तव्यच आहे. यापुढील काळातही आयडीबीआय बँकेच्या व डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून अशा उपक्रमांसाठी आम्ही प्राधान्याने मदत करू.
– प्रदीप हांडे – व्हाईस प्रेसिडेंट आय डी बी आय सर्व्हिसेस लिमिटेड.

यावेळी डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून दिवाळीत राबविण्यात आलेल्या एक साडी “ती” च्यासाठी या उपक्रमांतर्गत चार हजार साड्या व एक हजार फराळाचे पॅकेट वाटप करण्यात आले होते. या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी ह.भ.प. पंकज महाराज गावडे, आय डी बी आय ट्रस्टशिप सर्विसेस लिमिटेडचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप हांडे, कृषी तज्ञ संतोष सहाणे, डी वाय एस पी निलेश वाजे, सकाळ माध्यम समूहाचे गणेश कदम , फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, अध्यक्ष महेंद्र बिडवई, संचालक कुशल करेवार, संतोष यादव, शरद जाधव, अमोल रानमोडे, गणेश कोकणे, आदिनाथ चव्हाण, रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष अतुल परदेशी, रोटरी क्लब ऑफ नारायणगाव हायवेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत फुलसुंदर, उद्योजक भाऊसाहेब काशीद, श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाणे, राजाराम पाटील वृद्धाश्रमाचे संस्थापक विवेक तांबोळी , सावित्रीबाई फुले वृद्धाश्रमाच्या संस्थापिका नंदाताई मंडलिक, जीवन ज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काशीद, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या राजश्री कदम, राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्राचे अध्यक्ष दीपक चव्हाण, अरुण शेरकर, पुष्पा गोसावी, आरती ढोबळे, सीमा रघतवान, शंकर ताम्हाणे, जयवंत डोके, भगवान हांडे , रोहिदास बिडवई , दीपक कोकणे, समीर जाधव, अशोक वऱ्हाडी, दिलीप भगत, संदीप ताजने, सचिन पांडे, राहुल दातखिळे, विलास बटवाल, राजेश गावडे, सत्यवान खंडागळे, गणेश मेहेर, इम्तियाज चौगुले, संतोष पवार, श्रीकांत सोनवणे, योगिता चव्हाण, स्मिता शहाणे,प्राध्यापक संतोष रघतवान ,अजय भोर, प्राध्यापक शरद मनसुख , गणेश रासकर, शरद ताजने , आदी मान्यवर व दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले, एफ.बी. आतार व सौ अर्चना पवार यांनी सूत्रसंचालन केले , तर आदिनाथ चव्हाण यांनी आभार मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *