गुजरात निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान मोदी २५ सभांना संबोधित करणार

१९ नोव्हेंबर २०२२


गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. गुजरात निवडणुकीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यभरात एकूण 25 सभा घेणार आहेत. पंतप्रधानांच्या रॅलीचे नियोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात आले असून, त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 नोव्हेंबर रोजी सौराष्ट्र दौऱ्यावर जाणार असून तेथे ते वेरावळ, धोराजी, अमरेली आणि बोटाडला भेट देणार आहेत. या ठिकाणी पंतप्रधान मोदी जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. यंदा देखील गुजरातमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चबांधणीला सुरुवात झाली आहे.

वलसाड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते आणि संघटनेने आज पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली आहे. वलसाडच्या पारडी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कनू देसाई यांनी आज होणाऱ्या रोड शोच्या मार्गाची पाहणी केली. त्याचबरोबर पीएम मोदींच्या रोड शोबाबत सुरक्षा व्यवस्थेवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. पीएम मोदींच्या सुरक्षेसाठी 9 एसपी, 17 डीएसपी, 40 पीआय, 90 पीएसआय यांच्यासह 15000 पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *