नाशिक मुंबई हायवेवरील कसारा घाटात कंटेनरचा भीषण अपघात

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२९ ऑक्टोबर २०२२


नाशिक मुंबई हायवेवरील नवीन कसारा घाटात कंटेनरचा भीषण अपघात झाला. ब्रेक फेल गेल्यानं एक कंटेनर घाटातील संरक्षक कठडा तोडून थेट 50 फूट खोल दरीत कोसळला.

कंटेनर दरीत कोसळतानाही चालकाने कंटेनर सोडला नाही. चालक कंटेनरच्या आतच अडकला होता. दरीत कोसळल्यानंतर चालकही अपघातग्रस्त कंटेनरच्या खालीच अडकला गेला. या भीषण अपघातातून जखमी चालक बचावला आहे. तब्बल एका तासाच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर कंटेरनच्या आत अकडलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश आले. चालकाचं कंटेनरवरील नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात घडला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *