लॉकडाऊननंतरही शाळेत जाण्यासाठी बस सुरू झाली नाही

१४ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन ते तीन किलोमीटर पायी चालत जावे लागते . लॉकडाऊनपूर्वी या मुलांना बससेवा होती; मात्र लॉकडाऊननंतर शाळेत जाण्यासाठी बस सुरू झाली नाही. उपनगरांतील वाड्या – वस्त्यांवर दोन – तीन किमीवर महापालिकेच्या शाळा आहेत . या शाळेतील विद्यार्थ्यांना चालत जावे लागते . त्यांच्या पालकांना स्कूल बस किंवा रिक्षाचा खर्च करता येत नाही . परिणामी शिकण्याची इच्छा असल्याने असूनही शाळा दूर विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही . त्यामुळे बससेवा सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता रुद्रवार यांनी केली आहे.

लॉकडाऊनपूर्वी विद्यार्थी घेत होते बसचा लाभ लॉकडाऊन आधी मुलांना ने – आण करण्यासाठी महापालिकेने शाळेच्या वेळेत बस उपलब्ध करून दिली होती . रावेत , चिखली , मोशी आदी परिसरात या बस सुरू होत्या ; मात्र कोरोनात शाळा बंद झाल्या अन् त्यात ही बससेवाही बंद झाली . आता शाळा सुरू होऊन अर्धे वर्ष उलटले तरी बस सुरू केली नाही . त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे रुद्रवार यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *