मणिपूरमध्ये स्कूल बसचा भीषण अपघात

२१ डिसेंबर २०२२


मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात स्कूल बसाला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात स्कूलबस उलटून पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यादरम्यान २० जण जखमी झाले आहेत. मणिपूरची राजधानी इंफाळपासून ५५ किमी अंतरावर लोंगसाई भागाजवळ ओल्ड कछार रोडवर हा अपघात झाला.

थम्बलून हायर सेकेंडरी स्कूलची ही बस होती. विद्यार्थ्यांच्या दोन बस नोनी जिल्ह्यातील खौपुम इथं वार्षिक कार्यक्रमासाठी जात होत्या. स्कूल बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस पलटली आणि भीषण अपघात घडला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *