देवदर्शनाहून परतणाऱ्या शिरुरच्या (अमदाबाद) भाविकांवर काळाचा घाला, चौघांचा मृत्यू तर बाकी गंभीर

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. २३/०३/२०२३.

देवगड व शनिशिंगणापूर येथून देवदर्शन घेऊन पुन्हा आपल्या गावी आमदाबाद (शिरुर) येथे माघारी येत असताना, बुधवार दि. २२ मार्च २०२३ रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास, पुणे – नगर हायवे वरील सुपे व कामरगाव या गावांच्या दरम्यान, चौधरी धाब्याजवळ एका उभ्या असलेल्या कंटेनरला भाविकांच्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने, मौजे आमदाबाद, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील चौघांचा दुर्दैवी मुत्यू झालाय. मृतांमध्ये १) राजेंद्र विष्णू साळवे (वय 33 वर्ष), (२) विजय राजेंद्र अवचिते (वय 26 वर्षे), (३) धीरज मोहिते (वय 10 वर्षे), (४) मयुर संतोष साळवे (वय 25 वर्षे), यांचा समावेश असून बाकी लोक जखमी आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी अहमदनगर येथील पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 


विशेष म्हणजे अपघातग्रस्त अनेकजण या एकमेकांचे नातलग असून, एकाच गावातील असल्याने आमदाबाद सह संपूर्ण तालुका शोक व्यक्त करत आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेला युवक विजय राजेंद्र अवचीते हा शिरूर येथे ऊर्जा शॉपी येथे कामाला होता. सर्वांशी हसून खेळून असणाऱ्या या युवकावर काळाने घाला घातला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातग्रस्त सर्वचजण गावाच्या कारभारात हिरीरीने भाग घेत असल्याने, अख्खा गाव नगर येथे जमा झाला असून सर्वांचीच जमेल तशी मदत सुरू आल्याची माहिती, माजी सरपंच प्रकाश थोरात, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अशोक माशेरे, दत्ता साळवे व अण्णापुर चे पोलीस पाटील अप्पासाहेब जाधव यांनी दिलीय.
अपघातातील काहीजण गंभीर असून त्यांच्यावर नगर येथे खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. त्यात अक्षय किसन साळवे, संदीप शिवाजी साळवे, गुरुनाथ रावसाहेब साळवे, ऋतिक किसन साळवे यांचा समावेश असून बाकीच्या अपघातग्रस्तांमधील, आमदाबाद चे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप भाऊसाहेब साळवे, पोपट संपत घुले, खंडू काशिनाथ नरवडे यांना व इतर चार पाच जणांना थोडा मार लागलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *